शून्यात लावलेली नजर, डोळ्यातून वाहणारे पाणी, दप्तर उचलण्याचीदेखील ताकद नसलेला तो आज पहिल्यांदाच शाळेत आला होता. आज वयाची सहा वर्षे पूर्ण झालेला हा जीव औपचारिक शिक्षण प्रवाहात दाखल झाला होता. नाव “तानाजी” पण गुणवत्तेचा “गड”सर करण्याचे फार मोठे आव्हान आता समोर उभे ठाकले होते. शिकण्यातील आव्हाने असणाऱ्या मुलांच्या बाबतीत गुणवत्तेचे माझे स्वतःचे असे निकष […]
Archives for August 2018
ज्ञानाची घटस्थापना
बहुतांश शाळांमध्ये सगळे सण-समारंभ जल्लोषात साजरे होत असतात. त्यातून जर स्टाफमध्ये महिलावर्गाचा भरणा जास्त असेल तर उत्साहाला उधाणच येतं. लातूर जिल्ह्यातील आमच्या वरवंटी जिल्हा परिषद शाळेमध्ये सात शिक्षिका आणि मुख्याध्यापक श्रावण भोई असा शिक्षकवृंद. दरवर्षीप्रमाणे उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्याची चर्चा करीत असतानाच नीता कदम मॅडम यांनी सुचविले की यावर्षी आपण ‘ज्ञानाची घटस्थापना’ हा अनोखा उपक्रम […]
माझे अक्षर, खूप सुंदर
श्रवण, उच्चारण, भाषण, वाचन आणि लेखन या भाषाविकासाच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. यातील ‘लेखन’ हा भाग जाणीवपूर्वक शिकण्याचा आणि कौशल्याचा भाग आहे. विद्यार्थीदशेत तर चांगले अक्षर असणे फार महत्त्वाचे असते. नाहीतर अनेकदा खराब अक्षरामुळे शाळेतून, वर्गातून शिक्षकांचा किंवा घरी पालकांचा ‘हे काय मांजराचे पाय उंदराला?’ असा ओरडा मुलांना मिळतो. ‘सुंदर अक्षर हा दागिना आहे’ किंवा […]