मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका. 2017 साली जुलै महिन्यात आजूबाजूच्या टेकड्यांवरील हिरवाई बघत आम्ही बऱ्याच आत असलेल्या जरेवाडी शाळेत पोहोचलो. बीड जिल्ह्यातील ही पहिली आयएसओ शाळा, आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या संदीप पवार सरांना भेटण्याची आणि शाळा पाहण्याची उत्सुकता समता.शिक्षा टीमला होतीच. पाहताक्षणी शाळा म्हणजे एखाद्या हिलस्टेशनवरचे हॉटेलच वाटले. चढ- उतार आणि टेकड्यांवर वसलेली सुंदर […]
Archives for December 2017
बीडची जरेवाडी शाळा- 2
जरेवाडी शाळा सध्या आठवीपर्यंत आहे. पवार सर सांगतात, ‘1995 साली मी जेव्हा या शाळेत रूजू झालो तेव्हा 6 विद्यार्थी अचानक शाळेत यायचे बंद झाले होते. गावात चौकशी केली असता समजले की या गावातील बहुतेक लोक ऊसतोडणी कामगार म्हणून आजूबाजूच्या जिल्ह्यातील गावात जातात. त्यासोबत अनेकदा ते मुलांनाही घेऊन जातात आणि मग शिक्षणाची लिंक तुटते आणि बऱ्याचदा […]
बीडमधील आदर्श तंबाखूमुक्त शाळा: पंचाळेश्वर
बीडच्या गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर जिल्हा परिषद आयएसओ शाळा. अंगणवाडी पासून ते पाचवीपर्यंत असणाऱ्या या शाळेत सध्या दोनच शिक्षक कार्यरत आहेत. शाळा प्रसन्न रंगसंगतीने रंगविलेली आहे, शाळेतील शिक्षकांनी स्वत: भरपूर ज्ञानरचनावादी साहित्य बनविलेले आहे. पंचाळेश्वर शाळेला नुकताच 2017 साली ‘तंबाखूमुक्त शाळा’ पुरस्कारही देण्यात आला आहे.या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम इतक्या चांगल्या प्रकारे पटवून दिले आहेत, […]
टेबलांच्या उतरंडीकडे नव्याने बघताना (त्रिकोणी संख्या)
आज वर्गातील टेबले ज्या पद्धतीने मांडली होती तिकडे माझे अचानक लक्ष गेले. मी प्रत्येक ओळ मोजली तर ४+५+६ अशी उतरंड होती. अरे व्वा! त्रिकोणी संख्या! पण मला ४+५+६= १५ हे लक्षात आल्यावर गंमत वाटली कारण १५ या त्रिकोणी संख्येची गणिती मांडणी: १+२+३+४+५ अशी आहे. माझे विद्यार्थी आसपास असतील तर अशा शोधात मी त्यांना पण सामील […]
तोंडी गणित
संख्यांविषयीची समज वाढविण्यासाठी मनातल्या मनात गणिती क्रिया करण्याने मदत होते. यामुळे आपण आकड्यांशी खेळायला लागतो. हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण गणित हा विषय हा अशा प्रकारेच विकसित होणारा आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा संख्यांना विभाजणारा आणि जोडणारा खेळ सहजगत्या येत नाही, ते मनातल्या मनात गणिती क्रिया करताना गोंधळतात आणि त्यामुळे चुकतात, एवढेच नव्हे तर आपण चुकलो […]